Uncategorized

खाकीचे रक्षण, सुरक्षेचे वचन! रक्षाबंधनाला कराड पोलिसांकडून भगिनींना ‘सुरक्षा कवचा’ची आगळीवेगळी भेट

रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी जपण्याचा दिवस. याच भावनेतून कराड तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदारांचा रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी महिला पोलीस अंमलदारांना रक्षाबंधनाची भेट म्हणून हेल्मेट देण्यात आले. कर्तव्य बजावताना महिला पोलिसांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिलेली ही भेट केवळ औपचारिक न राहता त्यांच्या सुरक्षेचा संदेश देणारी ठरली.

कार्यक्रमास पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सतीश जाधव, सचिन भिलारी, धर्मेंद्र मगरे तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले यांच्यासह कराड तालुका पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

महिला पोलीस अधिकारी व अंमलदार या कर्तव्य बजावताना अनेक आव्हानांना सामोरे जात असतात. त्यांच्या योगदानाचा सन्मान करत त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यामुळे कराड तालुका पोलिसांचा हा रक्षाबंधन सोहळा बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी’ जपणारा आणि पोलिस कुटुंबातील आपुलकी अधिक घट्ट करणारा ठरला. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांनी या उपक्रमाचे कौतूक केेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button