Uncategorized

उद्यापासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर रीतसर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सातारा तालुका पोलिसांची मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर धडक मोहीम; अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना थेट इशारा.

सातारा तालुका पोलिसांची मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर धडक मोहीम; अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना थेट इशा

सातारा: मोळाचा ओढा ते कोंडवे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रस्त्यालगत ठाण मांडणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता, सातारा तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा आपली यंत्रणा सज्ज केली आहे. गुरुवारी या परिसरात पोलिसांनी विशेष मोहीम राबवून रस्त्याकाठच्या विक्रेत्यांना उद्यापासून कायदेशीर कारवाईचा सज्जड इशारा दिला आहे.

मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गावर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते रस्त्याला लागूनच आपली दुकाने थाटतात. यामुळे खरेदीदारांची वाहने रस्त्यावरच उभी राहून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होतो. प्रवाशांची होणारी गैरसोय आणि अपघाताची शक्यता पाहता सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी या परिसरात प्रत्यक्ष भेट दिली.

 

यावेळी पोलिसांनी सर्व फळ व भाजी विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना रस्ता सोडून सुरक्षित ठिकाणी विक्री व्यवस्था करण्याची सूचना दिली. थेट दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई न करता पोलिसांनी प्रथम टप्प्यात विक्रेत्यांना योग्य त्या सूचना देऊन समज दिली आहे. मात्र, उद्यापासून या सूचनांचे उल्लंघन करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांच्या या निर्णयामुळे परिसरातील वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या कारवाईमुळे मोळाचा ओढा ते कोंडवे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button