Uncategorized

​’उद्या बुलडोझर फिरणार’ या एका बातमीने उडाली धांदल; कारवाईच्या भीतीने स्वतःच हटवले अतिक्रमण!

उद्याच्या कारवाईची धास्ती! हातोडा पडण्यापूर्वीच अतिक्रमाणावर फिरला स्वतःचाच झाडू!

साईबाबा चौक परिसरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पाहणी करून ऑन दि स्पॉट कारवाईचा निर्णय घेतला. तत्काळ रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सुचना तर काहींना नोटीसा बजावण्यात आल्या.

अतिक्रमण स्वतः हून काढून घ्या, अन्यथा कारवाईचा इशारा सर्वांना दिल्यानंतर साईबाबा मंदिर प्रशासनाने गणेश मंदिराच्या समोरील अतिक्रमण स्वतः हून काढून घेतले. तर कारवाईच्या भितीने चौकात अतिक्रमण धारकांच्या मध्ये धास्ती वाढली आहे.

गोडोलीतील वाहतूक कोंडीने सर्वांना वेठीस धरून अक्षरशः जेरीस आणले आहे. रंगतारा ने सातत्याने बातम्या, पाठपुरावा करत अखेर यावर नगरपालिका, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार ८ ऑगस्ट रोजी संयुक्त पाहणी केली. त्याच ठिकाणी ऑन दि स्पॉट अतिक्रमण, विनापरवाना कच्चे पक्के बांधकाम यावर सूचना, नोटीस द्या, मात्र सोमवार दि.१० ऑगस्ट पासून मुलाहिजा न ठेवता थेट कारवाई करा, यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्थानिक नगरसेवकांनी स्पष्ट केले.

त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाने चौकातील अतिक्रमण धारकांना सुचना, नोटीस बजावत स्वतः हून अतिक्रमण काढू घ्या, कारवाई अटळ असल्याचे सांगितले.

त्यावर साईबाबा मंदिरासमोर असलेल्या गणेश मंदिराच्या समोरील पत्र्याचे शेड मंदिर प्रशासनाने अध्यक्ष प्रसाद शिंदे, खाडे, संजय कदम स्वतः उभारुन रविवार दुपारी काढून घेतले. तर आजूबाजूच्या अनेकांनी साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button