Uncategorized

सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक २०२६

सातारा जिल्हा नियोजन समिती बैठक २०२६

आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत पायाभूत सुविधा, ग्रामीण व नागरी विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, कृषी, पर्यटन तसेच विविध विभागांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विकासकामांना अधिक गती मिळावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सातारा जिल्ह्याचा विकास अधिक वेगवान, सर्वसमावेशक आणि नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर समन्वय, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

याप्रसंगी पालकमंत्री श्री.शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री.जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री श्री.मकरंद पाटील, खासदार श्री.नितीन पाटील, खासदार श्री.धैर्यशील मोहिते पाटील, विधानपरिषद आमदार श्री.धैर्यशील कदम, आमदार श्री.महेश शिंदे, आमदार श्री.अतुल भोसले, आमदार श्री.मनोज घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.प्रियाताई शिंदे, जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#satara #collectoroffice

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button