स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीला अटक, २७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीला अटक, २७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सुमारे २७ लाख ६५ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळांवरील भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान मेढा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणात महेश भिमा शिंदे (वय ३२, रा. शाहूनगर, सांगवी, ता. फलटण) याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर पोलिसांनी सलग तीन दिवस विविध ठिकाणी छापे टाकून त्याचा शोध घेतला.
अखेर ८ जून २०२६ रोजी तो सातारा शहरातील संगमनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर महेश शिंदे याने आपल्या साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून १० तोळे वजनाचे सुमारे १५ लाख ९ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ५१ हजार २७६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरलेली १२ लाख रुपये किमतीची कार आणि मोबाईल हँडसेट असा एकूण २७ लाख ६५ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेश शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यांत एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
या उल्लेखनीय कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलिस निरिक्षक रोहित फार्णे, पोलिस उपनिरिक्षक परितोष दातिर, सफौ. अतीष घाडगे, राजु मुलाणी, पोलिस हवालदार विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सुजित भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, हणंमत भोसले, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल शिंदे, किरण जगताप, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, इरफान मुलाणी, महेश निर्मळ, शिवाजी गुरव, आनंदा भोये, महिला पोलीस अंमलदार स्वाती रणपीसे, शकुंतला सणस, अधिका वीर, प्रीती पोतेकर, काजल साबळे, अपेक्षा देवाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.



