उप मुख्यमंत्र्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी दिल्या सायकली भेट.
उप मुख्यमंत्र्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी दिल्या सायकली भेट...

प्रतिनिधी (अजित जगताप)
महाबळेश्वर दि: निसर्ग रम्य शिवसागर जलाशयाचा परिसर आता पर्यटनासाठी सज्ज झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या दरेतांब गवातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी उपमुख्यमंत्री शिंदे थेट
मुंबईकडे रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांनी अजून स्थानिक शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली वाटप करून मुलांनी शिक्षणामध्ये गावाचे नाव उज्वल करावे .असा मौलिक सल्ला दिला. सायकल हाती मिळतात मुलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते.
दुर्गम कांदटी व कोयना विभागातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभर शाळेसाठी पायी प्रवास करताना खूप यातना सहन कराव्या लागतात. निसर्गाशी लढावे लागते. परंतु, भूमिपुत्र असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे या परिसरात आता नागरी सुविधा झपाट्याने उपलब्ध होत आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन वतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन सुद्धा होत आहे.या दुर्गम भागातील गोरगरीब कष्टकरी तब्बल २५० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
राजकारण बाजूला ठेवून कोणतीही विधान परिषदेची निवडणुकीबाबत साधी चर्चाही न करता फक्त विद्यार्थ्यांशी सवाद साधला सायकल वितरणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा गप्पा मारल्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.नियमित शाळेत जाण्याचे विनंती केली. शिक्षणामुळे प्रगती होते.आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्वल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. असं त्या विद्यार्थ्यांना ठासून सांगितले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विद्यार्थी बालकांची संवाद साधल्यामुळे खऱ्या अर्थाने या भागातील मातीची नाळ असणारी आपुलकी दिसून आली आहे.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ संजय मोरे ,गणेश उतेकर, संभाजी पाटील, संतोष मालुसरे, अजित संकपाळ, रुपेश शिंदे, गणेश भोसले, विजय सपकाळ, बाळा कदम, संपत शिंदे, संजय गोळे, आनंदा रांजणे, किरण उतेकर तसेच विविध गावातील विद्यार्थी आणि तापोळा, बामणोली, मोरणी उचाट , गोगवे , वाणवली, चकदेव, दरे बुद्रुक, दरेतांब, म्हावशी,पावसेवाडी, फुरूस, मुनावळे, आवळी परिसरातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दरेतांब गावी विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करताना
(छाया- अजित जगताप, दरे )



