
मा.निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा.डॉ.वैशाली कडुकर अप्पर, पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी. उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी सपोनि “श्री सशिल भोसले, वाठार पोलीस ठाणे यांना पोलीस स्टेशन हददीत. बेकायदेशीर गांजा विक्री करणा-या इसमांवर कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि श्री सुशिल भोसले यांनी त्यांचे पोलीस ठाणेच डी.बी. पथकास गोपणिय माहिती काढणेसाठी मार्गदर्शन कले होते.
दिनांक 03/06/2026 रोजी श्री.सपोनि भोसले यांना गोपणिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे वाठार स्टेशन गावचे हददीत वाठार’ ते लोणंद जाणारे रोडलगत, वस्तीमध्ये एक महीला अवैध्य गांजा ची विक्री करीत ‘आहे. अशी माहीती मिळताच त्यांनी उपविभागीय’ पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी कोरेगाव विभाग यांना सदर माहीती कळवुन त्यांचेकडुन लेखी परवानगी घेवुन पोलीस स्टाफ सोबत कार्यकारी दंडाधिकारी यांचेसह मिळाले बातमीचे ठिकाणी जावून अचानक छापा ‘ टाकला असता तेथे एक महीला तीचे जवळ एक पांढ-या बारदान्याची पिशवी घेवून बसून होती तीला महीला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेऊन तीचे नाव गाव विचारले असता तीने रुपाली लक्षमण बुधावले वय 32 वर्षे रा.वाठार स्टेशन ता.कोरेगाव जि.सातारा असे सांगीतले तीची व सोबत असलेल्या बारदान्याच्या पिशवीची तपासनी केली असता तीचेजवळ हिरवट रंगाचे पानेफले, बिया असलेले गांजा वनस्पतीचे शेंडे म्हणजेच उग्र वास येणारा ओलसर व वाळलेला गांजा 23,275/- रुपये किमतीचा व 931. ग्रॅम वजनाचा, मिळून आला असुन तो गृन्हयाचे पूढील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. सदर महिलेस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोरेगाव यांचेसमक्ष हजर ठेवले असुन तीस 02 दिवसांची ‘पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोउनि.गहिनीनाथ सातव हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा.डॉ.वैशाली कड्कर अप्पर पोलीस अधिक्षक सों.सातारा, मा.श्रीमती! राजश्री ‘तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, नायब तहसीलदार सुनिता दिमते कोरेगाव, पोउनि. गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, सहा. फौजदार बुवासो वाघमारे, पो.हवा.उदय जाधव, जितेद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, दिपक साबळे. किरण जाधव. पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, एकनाथ’ सरगर, अधिक शेलार चालक पोहवा. संदिप गोरे, विजय ढाणे, महीला पोलीस हवा.दिपाली गुरव, माधुरी दिक्षीत, पुजा जगताप यांनी सदर कारवाईत ‘ सहभाग घेतला ” असुन सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांचे श्री.निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा,” मा.डॉ .वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.



