Uncategorized

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

सातारानगरीचा थाट, सातारवासियांची मोठी उपस्थिती आणि उत्साही वातावरणात आतषबाजी यासह सातारा नगर परिषदेने नगर परिषदेसमोर उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, पालक मंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री महेश शिंदे, सुनील कांबळे, अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर व नगरसेवक यांच्यासह सातारावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रति देऊन स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button