Uncategorized
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा.
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाने आता राजकीय वर्तुळातही मोठे वादळ निर्माण केले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- व्हायरल व्हिडिओमुळे वाद वाढला
या प्रकरणाला अधिक गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडिओमुळे जनतेत संताप वाढला आणि विरोधकांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.



