Uncategorizedमहाराष्ट्र

सातारा नवोदयमध्ये फुटबॉल वितरण कार्यक्रम संपन्न

फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन' या संस्थेच्या सहकार्यातून केले गेले.

क्षेत्रमाहुली (१६ फेब्रुवारी) पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्रमाहुली सातारा येथे जिल्हास्तरीय फुटबॉल वितरण सोहळा कार्यक्रम’ उत्साहात संपन्न झाला. फुटबॉलचे वितरण FIFA (फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’ या संस्थेच्या सहकार्यातून केले गेले. जिल्ह्यातील जवळ जवळ ४० शाळा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे जागळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा, शिस्त, आणि नेतृत्व पांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती, एकजूट, जिद्द आणि आत्मविश्वास ही चतुसूत्री पाहायला मिळाली

या कार्यक्रमासाठी श्री रामनाथ वायफळकर (राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व सातारा फुटबॉल असोसिएशनचे सदस्य) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्याव्यांनी क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठे स्वप्न पाहावे व ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी. आपल्या भाषणातून मुलांना आशावादी बनण्याचा मोलाचा सल्लाही दिला

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या प्राचार्य महोदया श्रीमती अॅन्सी जॉर्ज यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याचा मूलमंत्र दिला खोलते रहो खिलते रहो असा संदेशही विद्याभ्याँना दिला.

कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाचे अनुभवी शिक्षक श्री. बी. डी सूर्यवंशी, कीड़ा शिक्षिका श्रीमती नीलिमा गावंडे, क्रीडा शिक्षक जे बी पाटील, मराठीचे शिक्षक श्री प्रसाद कांबळे व समुपदेशक श्री गणेश ताबे यांनी कैले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीलिमा गावंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे बी पाटील यांनी केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अल्पोपहार व चहापाणी घेऊन उपस्थित सर्व शाळेच्या प्रतिनिधींना फुटबॉल वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button