Uncategorized

स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई संशयीत इसमास जेरबंद.

स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई संशयीत इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई
संशयीत इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

मा.श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक,सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.

आज दिनांक 15/06/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील सह्याद्री ढाब्याचे समोर रोडवर एक इसम त्याचे ताब्यातील काळे रंगाचे वेस्पा मोटार सायकल क्रमांक MH-11-DR-0981 वरुन गावठी पिस्टल विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखचे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील मौजे महागांव,ता.जि.सातारा गावचे हद्दीतील राजधानी हॉटेलचे शेजारी असले पैलवान पानशॉपचे समोर रोडवर सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन येत असताना त्यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह , एक जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सातारा शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),7,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.

सदर कारवाई मध्ये मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ, इरफान मुलाणी यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button