Uncategorized

केळघर ते आंबेनळी घाट बनला ‘मृत्यूचा सापळा’; शेकडो बळींनंतरही प्रशासन ढिम्म!

शेकडो संसार उद्ध्वस्त, अनेक निकामी; पण केळघर घाटातील 'यमाचा पाश' हटायला मार्ग मिळेना!

(सातारा प्रतिनिधी मोहन जगताप)सातारच्या घाटमाथ्यावरुण सुरू होणारा केळघर ते महाबळेश्वरहून कोकणाला जोडणारा आंबेनळी घाट आड ( बाजीरे )पोलादपूर 67 किमी मार्ग या ठिकाणी संपला जातो.गत 5 वर्षात शेकडो लोकांचे बळी घेणार्‍या अनेकांना अपंगत्व देणार्‍या या रस्त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अनेक अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे याकडे यंत्रणेने वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवाशांच्यातून आहे.

सातारा जिल्ह्यातून कोकणाला जोडणारा केळघर ते महाबळेश्वर हा 18 किमी तीव्र चढ उतार असलेला मार्ग व महाबळेश्वर ते प्रतापगड हा मार्ग 18 किमी असून रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट हा 31 किमी अंतरावर असून या 67 किमी मार्गावर आजपर्यंत पाच वर्षात 100 पेक्षा जास्त अपघातांची मालिका सुरू आहे.

या रस्त्यावरील 100 हून अधिक अपघातांची मालिका सुरू असून शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकजण जखमी अवस्थेत आजही अपंगत्वावर मात करीत जिवन जगत आहेत.असे असले तरी या मार्गावरून प्रवासाला जाणारे लोक मुठीत जीव घेवून प्रवासाला जाताना दिसत असून या शेकडो प्रवाशांचा बळी घेणार्‍या या रस्त्यावरील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची जाणीव या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बोलण्यातून जाणवली असून या मार्गावरील अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रवाश्यांची मागणी होत आहे.

केळघर घाट माथ्यापासून सुरू होणार्‍या या रस्त्यावरून कोकणाला जोडणारा ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
मेढा पोलीस ठाण्यात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना 62 अपघात घातल्याची नोंद करण्यात आली आहे. 29 लोकांचे बळी गेले आहेत तर 35 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
महाबळेश्वरला पोलीस ठाण्यात 18 अपघात झाले होते. 8 जणांचे बळी घेणार्‍या घाटात 10 पेक्षा अधिक जखमींची नावे येत आहेत. पोलादपूर पोलीस ठाण्यात आंबेनळी आड ( बाजीरे ) पिकनिक पॉईंट दरम्यान शेकडो छोटेमोठे अपघातातील मृत्युमुखी 52 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर शेकडो लोकांना या ठिकाणी जखमी अवस्थेत जनजीवन जगत आहेत.

घाटमाथ्यावरुण कोकणाला जोडणारा ह्या रस्त्यावरून आजही छोट्या मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असून गेले कित्येक वर्षे या क्षेत्रात सार्वजनीक बांधकाम विभागाचे काम चालू असताना तेथील या विभागातील गलथानपणा अनेकदा उघड झाला असून संबधित यंत्रणा व ठेकेदार यांना या कामातील दर्जा व उपाययोजनांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे प्रवाशी वर्गातून होत आहे

  • केळघर महाड बोगदा व्हावा पंढरपूर ते मेढा महाबळेश्वर मार्गे पोलादपूर हा कोकणाला जोडणारा रस्त्यावरून प्रवाशी प्रवास करतात त्यामुळे महाबळेश्वरला अत्यंत ट्राफिक होत असल्याने जनजीवन विस्कळीत होते पर्यायी मार्ग म्हणून केळघर घाटाखालून ते महाड असा पर्यायी बोगदा काढण्यात यावा यामुळे कमी वेळेत व कमी अंतरं होवून कोकण व सातारा जिल्ह्याला पर्यटन वाढीस लागेल. बोगदा होण्याची मागणी पर्यटकांची आहे महारूद्र त्रिकुंडे सामाजिक कार्यकर्ते सातारा

    ================================

    ढिसाळ उंच कड्या ढासळण्या आधी बंदोबस्त करावा केळघर मार्गे पोलादपूर प्रवासातील मार्गावर प्रवाश्यांची नेहमीच रेलचेल असते या मार्गावरून प्रवासात काळ्या कड्या पासून सुरू होणारे अनेक ठिकाणी कडे आहेत हे कडे ढिसाळ असून पावसाळ्यात पाणी गेल्याने ते ढासळतात असे धोकादायक कडे काढून प्रवाशांना दिलासा दिला जावून हे धोकादायक कडे करण्यात यावेत स्नेहल जगताप माजी नगराध्यक्ष महाड नगरपरिषद .महाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button