Uncategorized

साताऱ्यात परळी भागात लग्नघरावर काळाचा घाला; ट्रक दरीत कोसळून एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू

साताऱ्यात परळी भागात लग्नघरावर काळाचा घाला; ट्रक दरीत कोसळून एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू

साताऱ्यात परळी भागात लग्नघरावर काळाचा घाला; ट्रक दरीत कोसळून एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू.

​सातारा: मुलाच्या लग्नाचे सामान हलवत असताना उभा असलेला ट्रक अचानक न्यूट्रल होऊन दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आई, आजी आणि दोन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

​येत्या १४ तारखेला मुलाचे लग्न असल्याने पुनर्वसन झालेल्या नवीन घरी साहित्य शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास चालक ट्रकच्या टपावर बॅग ठेवण्यासाठी गेला असता ट्रक अचानक मागे सरकला आणि थेट दरीत कोसळला.

​घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हृदयद्रावक घटनेमुळे सातारा जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button