जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६.
उमेदवारांनी पोलीस चारित्र्य पडताळणी ऑनलाईन करावी – पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवाहन.

सातारा जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज सादर करताना पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उमेदवारांना अधिकृत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी महा-ई सेवा केंद्रामार्फत pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी आपल्या वास्तव्यास असलेल्या हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन चारित्र्य पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी.
चारित्र्य पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्राची प्रत उमेदवारांनी नजिकच्या महा-ई सेवा केंद्रामधून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा विशेष शाखा, सातारा येथील पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
उमेदवारांनी विलंब टाळून वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.



