Uncategorized

मांढरदेव देवस्थानतर्फे साडी-ओटी व नारळ ठेक्यासाठी जाहीर निविदा

मांढरदेव देवस्थानतर्फे साडी-ओटी व नारळ ठेक्यासाठी जाहीर निविदा

वाई : मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळेश्वरी देवीस अर्पण होणाऱ्या साडी-ओटी व नारळांच्या ठेक्यासाठी मांढरदेव देवस्थान ट्रस्टतर्फे जाहीर निविदा (टेंडर नोटीस) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ठेका कालावधी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.

या ठेक्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून लिखित स्वरूपात व विहीत नमुन्यात देकार प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपले प्रस्ताव दोन स्वतंत्र सिलबंद पाकिटांमध्ये सादर करणे आवश्यक असून, एका पाकिटात बयाणा रकमेचा डिमांड ड्राफ्ट व दुसऱ्या पाकिटात देकार प्रस्ताव असणे बंधनकारक आहे. पाकिटावर स्पष्टपणे “साडी-ओटी नारळ ठेका” असा उल्लेख करणे आवश्यक आहे.

ठेका मंजूर झाल्यानंतर देकार रक्कम व त्यावरील ५ टक्के जी.एस.टी भरण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. इच्छुकांनी आपले देकार प्रस्ताव संचिव, मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, मांढरदेव, ता. वाई, जि. सातारा यांच्या कार्यालयात ही निविदा प्रसिद्ध झाल्यापासून दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावेत. सिलबंद नसलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.

प्राप्त झालेल्या निविदा दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता शासकीय विश्रामगृह, वाई येथे मा. चेअरमन, मांढरदेव देवस्थान ट्रस्ट तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (१), वाई यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित विश्वस्तांसमोर उघडण्यात येणार आहेत.

विहीत निविदा नमुना फॉर्म मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून दि. २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार विश्वस्त मंडळाने राखून ठेवलेला आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक ९३७०९४१९५७ / ९८२३९०२४७२ / ८७७९९२९४९७, ई-मेल mandhardevtrustwai@gmail.com किंवा संकेतस्थळ mandhardevi.com वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button