वनपरिक्षेत्र (प्रा.) कराड अंतर्गत कासारशिरंबे – बेलवडे रोडवरती रानडुकराची शिकार.
या प्रकरणी नऊ आरोपींना 4 दिवसाची वनकोठडी
कराड तालुक्यातील कासारशिरंबे-बेलवडे रोडवरती रात्रगस्त करीत असता, 11 रोजी पहाटे 05.00 च्या दरम्यान वन्यप्राणी रानडुक्कर अवैधरीत्या तस्करी करीत असलेचे, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाहन क्र. MH10 DT 6696 या वाहनाची तपासणी केली असता, गाडीमध्ये वन्यप्राणी जिवंत रानडुक्कर -7 तसेच शिकारीसाठी लागणारे वाघर, गॅस साहित्य, शिकारी पाळीव कुत्री 3 तसेच एकुण आरोपी – 9 अनुक्रमे 1. सोमनाथ बबन आडके रा. कासारशिरंबे ता.कराड, 2.अमोल मारूती माने रा. कासारशिरंबे ता.कराड, 3.सचिन हणमंत क्षिरसागर रा. कासारशिरंबे ता.कराड,4. सागर तानाजी यलमारे रा. कासारशिरंबे ता.कराड, 5.गणेश नामदेव नंदीवाले रा. जयसिंगपुर ता. शिरोळ,6. योगेश रघुनाथ कुंभार रा. मानकापुर ता. चिकोडी,7. अमोल गुंडाजी नंदीवाले रा. कोथळे ता. शिरोळ, 8. अमित संजय आडके रा. कासारशिरंबे, 9.दत्तात्रय धोंडीराम ढोणे रा.पलुस ता. पलुस या आरोपींकडे चौकशी केली असता सदरची वन्यप्राणी जिवंत रानडुक्कर -7 हि त्यांनी मौजे राजेगाव व गव्हाणधडी ता.माजलगाव जि.बीड या ठिकाणवरुन आणले असलेबाबत कबुल केले असलेणे त्या आरोपींना मुद्देमालासह अटक केली असून दि.11.11.2025 रोजी मे.प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना चार दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. त्यांचेवरती वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,50,51 अंतर्गत कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा 100000/- रु. दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे.
कराड वनपरिक्षेत्रातील लोकांना आव्हान करणेत येते कि,वन्यप्राणी शिकार करणे,अवैध्य वाहतुक,वुक्षतोड तसेच राखीव वनक्षेत्रात अतीक्रमण करणे, वनक्षेत्रात वनवनवा लावणे हे कायद्याने गुन्हा आहे.असे गुन्हे घडल्यास संबंधीतांवर वनविभागाकडून कडक कारवाई करणेत येईल.
सदर कारवाई श्री.अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक,सातारा वनविभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जयश्री जाधव सहा.वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) सातारा, श्रीमती ललिता पाटील वनक्षेत्रपाल (प्रा.) कराड,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, दिलीप कांबळे वनपाल कोळे, आनंद जगताप वनपाल मलकापूर, दशरथ चिट्टे वनरक्षक कासारशिरंबे, अभिनंदन सावंत वनरक्षक कोळे, कविता रासवे वनरक्षक तांबवे तसेच वनपरिक्षेत्र कराड येथील सर्व वनकर्मचारी, रेस्क्यू टिम मधील अजय महाडीक, रोहित कुलकर्णी यांनी मदत केली. पुढील तपास श्रीमती ललिता पाटील वनक्षेत्रपाल (प्रा.) कराड करीत आहेत.



