अतिउच्चशिक्षित दहशतवाद : सिन्दुर २ \ भारताला गाजा पट्टी किंवा हमास परवडणार नाही.
सिन्दुर २ \ भारताला गाजा पट्टी किंवा हमास परवडणार नाही
दीपक प्रभावळकर, सातारा
देशाने हजारो दहशतवादी घटना अनुभवल्यात. दहशतवादी म्हटलं की तो अशिक्षित, अनपड, माथेफिरू असाच चेहरा डोळ्यापुढे येतो. मध्यंतरी आपण “शहरी नक्षलवाद” हा शब्द अनुभवला आता “अतिउच्च शिक्षित दहशदवाद” पुन्हा एकदा उफाळून येऊ पाहतोय. त्यासाठी देशाबाहेर जसं सुंदर ऑपरेशन राबवलं गेलं तसं देशांतर्गत “सिन्दुर २” राबवण्याची गरज निर्माण झाली आहे .
यासाठी दोन घटना पाहू
गेल्या आठवड्यात पुण्याच्या एका आलिशान it कंपनीमधून जुबेर हंगेरेकर याला हा थेट अल कायदाच्या संपर्कात होता . त्याच्या कडून १९ लॅपटॉप जप्त करून एक तयार झालेलं जाळं मिळाले आणि कोंढवा भागातून आयसिस च्या समोरकामध्ये असलेल्या १८ जणांना ताब्यात घेतलं आहे .
आता घटना दुसरी ,
हरियाणाच्या फरीदाबाद मधून एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. “अल आलाहिद” या हॉस्पिटल मध्ये डॉ आदिल अली प्राध्यापक सुद्धा होता . त्याच्या हॉस्पिटल लोकांमधून १५ लॅपटॉप, २ एके छपन्न काही काडतुसे आणि बॉम्ब बनवायला लागणारी ३५० किलो अमोनिया नायट्रिक ऍसिड सापडलं आहे . डॉ आदिल सोबत तो नमाज पढायला जायचा तिथला मौलवीला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय .
या डॉक्टरच्या कॉन्टॅक्ट मधून जम्मू – काश्मीरमध्ये २०० ठिकाणी छापेमारी सुरू आहे .
आजवर आपण दहशवादी म्हटलं की, अशिक्षित, माथेफिरू समजत होतो . पण याच आठवड्यात अतिउच्च शिक्षित दहशदवाद समोर आलाय. पुण्याच्या आय टी कंपनीचा वापर असो की फरीदाबाद चा दवाखाना असो याचा वापर बॉम्ब बनवायला किंवा हत्यारे लपवायला होत असेल
तर
ही मोडस ऑपरेंडी केवळ आयसिस शी मिळती – जुळती नसून इस्रायल च्या मिळती आहे .
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिन्दुर ऑपरेशन करून टाळ्या वाजवणारे आपण देशांतर्गत अतिउच्च शिक्षित सुरू असलेला दहशदवाद कधी संपवणार आहोत .
देशांतर्गत सिन्दुर २ ऑपरेशन राबवून हा अतिउच्च शिक्षित दहशदवाद संपवला नाही तर देशात अनेक ठिकाणी “गाजा पट्टी आणि हमास” तयार होतील
उगाच फळ विक्रेता किंवा मिशा कापून दाढी वाढवून फिरणाऱ्या तिरस्कार नको जे अतिउच्च शिक्षित आहेत त्या एसीनेट करण्याची गरज आहे .
विशेष म्हणजे हे आर्टिकल लिहित असतानाच दिल्ली मध्ये कारस्फोट होऊन ९ जण मारले गेलेत , बळी गेलेत २० जण जेरबंद झालेत . आता हा किस्सा पुढील १५ दिवस १०\११ म्हणून गाजला जाईल अहोरात्र याची चर्चा होईल पण मूळ विषय अतिउच्च शिक्षित दहशदवाद खणून काढला जात नाही तोवर इथ गजापट्टी किंवा हमास सारख्या संघटना उभ्या राहू शकणार नाहीत .



