Uncategorized

मोरावळे येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात एक जण गंभीर जखमी

मोरावळे,प्रतिनिधी श्रीकांत गोळे

मोरावळे गावात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर तीव्र धडक बसल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नवनाथ चिकणे (रा. गांजे) हे आपली स्प्लेंडर दुचाकी (क्र. MH 11 BE 1146) वरून साताराहून मेढ्याकडे चालले होते. दरम्यान, मोरावळे गावातील एका वळणावर आले असता, समोरून महाबळेश्वरहून साताऱ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या युनिकॉर्न गाडीची (क्र. MH 13 FA 9677) त्यांच्या गाडीला समोरासमोर धडक बसली. युनिकॉर्न गाडी अमोल सरडे (रा. पंढरपूर) हे चालवत होते.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल: या अपघातात स्प्लेंडर चालक नवनाथ चिकणे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी साताऱ्यातील ‘मंगलमूर्ती हॉस्पिटल’ येथे हलवण्यात आले आहे. तसेच, युनिकॉर्नवरील सौरभ इंगवले (रा. विठा) आणि चालक अमोल सरडे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button